सत्व रज तमो गुण
त्रिभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण, स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती ।।१।। कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।। प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती, सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येती ।।३।। राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार, त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून ।।४।। […]