तृप्त मन
एक भिकारी लीन-दीन तो, भीक मागतो रस्त्यावरी, फिरत राही एकसारखा, या टोकाकडून त्या टोकावरी ।।१।। दिवस भराचे श्रम करूनी, चारच पैसे मिळती त्याला, पोटाची खळगी भरण्या, पुरून जाती दोन वेळेला ।।२।। मिठाई भांडारा पुढती, उभा ठाकूनी खाई भाकरी, केवळ मिठाईचा आस्वाद, त्याच्या मनास तृप्त करी ।।३।। देहाखेरीज कांहीं नव्हते, त्याचे ‘आपले’ म्हणण्यासाठी, परि […]