नवीन लेखन...

हर घडी मिळो सहवास

मानव देह देऊनी ईश्वरा, उपकार केले मजवरती, सेवा करण्या तव चरणाची, संधी लाभली भाग्याने ती ।।१।। कर्म दिले मानव योनीसी, श्रेष्ठत्व येई  त्याचमुळे, उद्धरून हे जीवन नेण्या, कामी येतील प्रयत्न सगळे ।।२।। मुक्त होणे जन्म मरणातूनी, साध्य होई प्रभूसेवेने, परि तीच मुक्ती वंचित करते, आनंदमयी प्रभू दर्शने ।।३।। एक मागणे प्रभू चरणी, मुक्ती न देई मजला, […]

चुकीचे मूल्यमापन

चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे….१,   कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली….२,   जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले…३,   यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी कर्तृत्व […]

विपरीत आनंद

खोड्या करणे, त्रास देणे, हाच बनला स्वभाव त्याचा वाटत होते बघून त्याला, दूरोपयोग करि तो शक्तीचा…१ पाय ओढणे, खाली पाडणे, कपड्यावरी तो चिखल फेकणे मारपिट ती करूनी केंव्हां, गुंडपणा तो करित राहणे…२, बेफिकीर ती वृत्ती तयाची, स्वार्थाने तो भरला पुरता तुच्छ लेखी इतर जनाना, स्व आनंद साधत असतां….३, ‘आनंद’ मिळवणे हेच ध्येय, जीवनाचे तत्त्व खरे ते […]

सिकंदरची शांतता

दिग्वीजयाच्या स्वारीवरती,  निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं,  महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे,  सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं,  एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला,  शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां,  शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी,  संपत्ती घेई लुटून सारी […]

स्वयंचे विस्मरण

बाह्य जगीं प्रभूसी शोधतो, विसरे जेव्हा ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ कांही काळची विस्मृती ही, ईश्वर चिंतनाच्या येई कामी…१, शरिर जेव्हां रोगी बनते, सुदृढतेची येई आठवण प्रकाशाचे महत्त्व वाटते, बघूनी अंध:कार भयाण…२, चालना देयी विस्मरण ते, शोध घेण्या त्याच शक्तीचे उकलन होते मग प्रभूची, स्मरण होता अंतर्यामीचे…३ – डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

खरी शांतता

वाटत होता शांत मला तो,  बघुनी त्याच्या हालचालींना शिस्तबद्ध ते जीवन असूनी,  हास्य उमलते त्याच्या मना….१, अल्प बोलणें अल्प चालणें,  आहार तोहीं अल्पची घेणे प्रभू नाम ते मुखी असूनी,  चिंतन त्याचे सतत करणे….२, संघर्षाला टाळीत होता,  परिस्थितीशी जुळते घेवूनी वातावरण ते शांत ठेवण्या,  प्रयत्न चाले लक्ष देवूनी…३, अहंकार तो सुप्त असूनी,  राग न दाखवी चेहऱ्यावरी जगण्याचे […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति….१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति….२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]

शांत निद्रा

शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी….१, निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला….२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली….३, बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला […]

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

मिळविण्यातील आनंद

आंस राहते सतत मनीं मिळत नसते त्याचे साठी प्रयत्न सारे होत असती हाती नाही ते मिळविण्यापोटीं प्रयत्न्यांत तो आनंद होता धडपड होती, होती शंका मिळविण्याच्या त्या लयीमध्यें जिद्द मनाची आणिक हेका यश मिळते जेव्हां पदरीं धडपड सारी थंडावते ज्याच्या करिता सारे सोशिले त्यातील उर्मी निघून जाते यशांत नाहीं आनंद तेवढा मिळविण्यांत जो दिसून येई कांहीं तरी […]

1 6 7 8 9 10 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..