नवीन लेखन...

दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी….१, चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे….२ वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते….३, घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन….४ […]

वेडी

रस्त्यावर उभी राहूनी, हातवारे ती करीत होती, मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती ।।१।।   गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’, ठाण्यात नेण्यास सांगू लागली ।।२।।   जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो ।।३।।   इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव […]

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी, ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या, जसे ग्रहमंडळ फिरती…१,   मित्र मंडळी सगे सोयरे, शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी, परिणाम ते होई सर्वांचे…२,   हेच सर्व ते ग्रह असूनी, सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची, वागण्यात तो फरक करती…३   अपयशाला कारणीभूत तो, असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ, ग्रहमान […]

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं, ठाऊक असते सर्वांना, मृत्यू हा अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।   आगमनाचा काळ त्याचा, कल्पनेनें ठरविला जातो, अचूक जरी शक्य नसले, विचार त्यावरी करीता येतो ।।२।।   जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो, जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।   तन मनाला सुख देऊनी, जीवन […]

भक्ष्य

नदीकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी, उडणाऱ्या माशीवरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।। नजीक येऊनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले, परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले ।।२।। बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी, झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।। ‘भक्ष्य बनने’ दुजा करीता, मृत्यूची ही चालते श्रृखंला, जनक असता […]

मैनेचे मातृहृदय

आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी, मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती ।।१।। एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली, पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली ।।२।। मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची, जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची ।।३।। युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी, रक्त बंबाळ केले […]

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे, कौशल्य सारे एकवटूनी, वृक्षाच्या उंच फांदिवरी, लोंबत होते झोके घेऊनी ।।१।। दूर जाऊनी चारा आणिते, पक्षीण आपल्या पिल्याकरीता, जग सारे घरटे असूनी, स्वप्न तिचे त्यांत राहता ।।२।। वादळ सुटले एके दिनी, उन्मळून पडला वृक्ष, पिल्लासाठी गेली होती, शोधण्यासाठी आपले भक्ष्य ।।३।। शाबूत घरटे फांदी वरते, वृक्ष जरी पडला होता, पिल्लामधली कुजबुज, असह्य […]

परमोच्य बिंदू

पाणी शोषत असतां ऊर्जा, उकळ बिंदूवर येते । पाण्याचे रुप बदलूनी, वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।। एक स्वभाव प्रकृतिचा, स्थित्यंतर जेव्हां घडते । एक स्थिती जावून पूर्ण, दुजामध्ये मिसळून जाते ।।२।। तपोबलाची ऊर्जा देखील, मानसिकता बदलून टाकीते । रागलोभादी षडरिपू जाऊनी, साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।। तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं, ईश्वरमय होऊन जाता । सारे […]

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जाऊनी भिडती, नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती ।।१।। शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी, मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई ।।२।। सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण दूषीत होते, संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करीते ।।३।। कारण जरी असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती […]

विधी कर्मांना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी, भस्म लाविले सर्वांगाला, वेषभूषा साधू जनाची, शोभूनी दिसली शरीराला ।।१।। खर्ची घातला बहूत वेळ, रूप सजविण्या साधूचे, एक चित्त झाला होता, देहा भोंवती लक्ष तयाचे ।।२।। शरीरांनी जरी निर्मळ होता, चंचल होते मन त्याचे, प्रभू मार्गास महत्त्व देतां, विसरे तोच चरण प्रभूचे ।।३।। विधी कर्मात वेळ दवडता, प्रभू सेवेसी राहील काय ?, देहाच्या […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..