नवीन लेखन...

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती असतील दाणे जसे तेच उगवती पेरता आनंद आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची   धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या […]

बाळकृष्ण

रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//   काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२// रंगले माझे मन मुरारी, नाम […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें   इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार   क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें   राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी   बालपणीच्या […]

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ?  १ तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ?  २ प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ?  ३ त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ?  ४ तोच […]

बाळाची भिती

खेळत होता बाळ अंगणीं    इकडूनी तिकडे मेघनृत्य ते बघत असतां    दृष्टी लागे नभाकडे उलटी सुलटी कशी पाऊले    घनांची पडत होती लय लागून हास्य चमकले     त्याच्या मुखावरती तोच अचानक गडगडाट झाला    एक नभांत दचकून गेले बाळ तत्क्षणी     होऊन भयभीत धावत जावून घरामध्यें    आईला बिलगले वाचविण्या त्या भीतीपासून     पदराखालीं दडले जरी थांबला गडगडाट    भीती कायम होती आवाजाचे नाद […]

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ// ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१// मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई   माझ्यातील   ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘  आहे, जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता  ‘अहं  ब्रह्मास्मि‘   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १   ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २   माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३   आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी […]

1 2 3 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..