नवीन लेखन...

नाम घेण्याची वृत्ती दे

सतत नाम घेण्यासाठीं,  बुद्धी दे रे मजला आठवण तुझी ठेवण्याची,  वृत्ती दे रे मनाला ……।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी,  अस्तित्व तुझेच जाणी श्वास घेण्याची शक्ती,  तुझ्याचमुळे असती जीवनातील चैतन्य,  तुजमुळेच मिळते सर्वांना…..१ सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला   अन्नामधले जीवन सत्व,  तूच ते महान तत्व सुंदर अशी सृष्टी,  बघण्या ते दिली दृष्टी आस्वाद घेण्या जगताचा, […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी … ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे… ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव… ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत […]

अपूर्ण जीवन

सोडून दे अहंकार तुझा लाचार आहेस आपल्या परि पूर्ण जीवन तुला न मिळे न्यूनता राहते कांहीं तरी…१ धनराशि मोजत असतां वेळ तुजला मिळत नसे शरीर संपदा हाती नसूनी मन सदा विचलित असे…२ शांत झोपला कामगार तो दगडावरी ठेवूनी डोके देह सुदृढ असूनी त्याचा पैशासाठी झुरतां देखे…३ उणीवतेचा कांटा सलूनी बाधा येत असे आनंदी म्हणून खरे समाधान […]

देह मंदीर

शरीर एक साधन,  साध्य करण्या प्रभूला ठेवूनी ती आठवण,  चांगले ठेवा देहाला…१ व्यायाम व आहार,  असतां नियमित सुदृढ ते शरीर,  असते मग बनत…२ सुदृढ असता देह, करावे मनाला शांत टाळत असतां मोह, न येई तो भावनेत…३ षडरिपू हे विकार,  काढा विवेकांनी निर्मळ ठेवा शरीर,  पवित्रता राखूनी…४ देह आहे मंदीर,  गाभारा तो मन आत्मा तो ईश्वर,  आनंद […]

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो…१ भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण…२ फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते…३ आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला…४ खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते ठसका लागून […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

माझा मीच गुरू

मीच माझा गुरू,  जे मनी ठरवू विचारांती तेच करू ….।।धृ।। सल्ला घेईन सर्वांचा,  वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं…१ मीच माझा गुरु निर्णय असे अनेक,  सारेच असती ठिक निवड एकाची करूं…२ मीच माझा गुरु, इतरांना जे वाटते,  माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं…३ मीच माझा गुरू शेवटीं माझ्या करिता,  गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू…४ मीच माझा […]

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशी, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 8 9 10 11 12 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..