भाव जाण तू देवा
कर पडले चरणीं भाव जाण तू देवा ।।धृ।। देह झुकला तुझ्या पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १ कर पडले चरणी भाव जाण तू देवा, प्रथम येई भावना, जागृत करते ती मनां मनाचा ताबा देहावरी तोच तुजला प्रणाम करी घे प्रभू तू जाणूनी अत:करणातील […]