जीवन ध्येय
प्रभूची लीला न्यारी विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी हीच त्याची महिमा ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो कोणी न समजे त्यासी ।।२।। मोठे मोठे विद्वान त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।। कांहीं असती नास्तिक कांही असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी मस्तक चर्चा करिती […]