सूड वलय
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।। मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।। धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।। जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।। […]