नवीन लेखन...

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली…१, जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते…२, निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ…३, स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत मन […]

सुक्ष्मात अनंत

एकटाच बसलो होतो,  खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१, दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे…२, जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता,  जाण त्याची येती….३, वातावरण निसर्गाने,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे,  गुण एकाचे अंगी….४, तेथे आहे जे येथेही,  व्यापूनी सर्व स्थळी ब्रह्माडांची व्यापकता,  बिंदूत एका […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

प्रेम नाणे

तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं   । अपेक्षा करता प्रेमाची, सदैव इतरांकडूनी…१, सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या जीवनीं  । क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी…२, प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला  । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला…३, याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे  । दोन मनें सांधली जाऊनी, आनंद […]

मुरब्बी

लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर  । आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर….१, विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार  । परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार…२, परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी  । ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही….३, विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो  ।। अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो…४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com       […]

वेळेची किमया

वेळ येता उकल होते, साऱ्या प्रश्नांची  । जाणून घ्या तुम्ही, रीत निसर्गाची…१, जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी  ।। वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे  । कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे  । उकल होऊन गुंत्यांची, आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल, […]

वातावरणाची निर्मिती

वातावरण  निर्मित होते,  जसे जातां वागूनी  । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये ,  सारी अंवती भंवती  । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी  । चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती ,  आपल्या  जवळूनी  । चलबिचल मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]

पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे  । सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे  ।। बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे  । निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे  ।। कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता  । क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता  ।। शिवीगाळ स्वभाव असतां   आदरभाव कसा मिळे  । शत्रुत्वाचे […]

मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती, मंद मंद प्रकाश देवूनी  । अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं  । असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे  । मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे….३ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

अणूतील ईश्वर

पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येते, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असते…१, या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही….२, हेच तत्त्व निसर्गाचे ,  तीन गुणांनी बनले, उत्पत्ती लय स्थिती,  यांनी सर्वत्र व्यापिले…३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे…४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती […]

1 16 17 18 19 20 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..