स्मृति
जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो काहीं काहीं राहती आठवणी ।।१।। बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना ।।२।। काळाचा असे महिमा आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति ।।३।। प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।। — डॉ. भगवान […]