सुदाम्याला ऐश्वर्य
गरीब सुदामा बालमित्र , आला हरीच्या भेटीला, बालपणातील मित्रत्वाची, ओढी मनाला ।।१।। छोटी पिशवी घेवून हाती, पोहे घेतले त्यात, फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत ।।२।। काय दिले वहिनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने, झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने ।।३।। बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते, मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते ।।४।। […]