भूतदया जागविली
चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।।१ वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।।२ घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।।३ भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून खिडकीतुनी फेकला ।।४ काम संपवूनी सांज समयी घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे पाहून चकित झालो ।।५ […]