कृष्णजन्मी देवकीची खंत
भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. //धृ// आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता //२ […]