नवीन लेखन...

ऋणानुबंध

ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

तुला लाभलेली निसर्ग देणगी

खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते  ।।१ इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी   ।।२ मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या  ।।३ इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला  ।।४ चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनी  ।।५   […]

ज्ञानाग्नि पेटवा

हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

गाण्याच्या कलेची किंमत

एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने   तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं   मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत   भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी […]

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२// […]

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।।   सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।।   नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।।   विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।।   सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी   घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर […]

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

1 3 4 5 6 7 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..