नवीन लेखन...

ऋण सद्गुरूचे

संत कसे बोलतात, कसे चालतात, निरनिराळ्या परिस्थितीत कसे वागतात, कसे निर्भय असतात, कसे निःस्पृह असतात, किती निरिच्छ, किती मृदू, परंतु किती निश्चयी, कसे निरहंकारी, कसे सेवासागर, किती निरलस, किती क्षमी, कसे त्यांचे वैराग्य, कशी निर्मळ दृष्टी, कसा विवेक, कसा अनासक्त व्यवहार, – हे सारे त्यांच्या सहवासात नित्य राहिल्यानेच समजत असते. […]

गोकुळ म्हणजे काय?

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले, पण या दोन राजांचे स्थान अटळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण. […]

गुरू-शिष्य

भारतीय संस्कृतीत गुरुभक्ती म्हणजे एक अत्यंत मधुर असे काव्य आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात या गुरुभक्तीचा अपार महिमा गायिला आहे. पुष्कळांना या गुरुभक्तीतील महान अर्थ समजत नाही. दंभाचा पसारा सर्वत्र वाढल्यामुळे, दिखाऊपणाचे स्तोम जिकडेतिकडे माजल्यामुळे थोर गुरुभक्तीचे महान तत्त्व आज धुळीत पडले आहे. […]

जीवनाहून सुंदर

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. […]

आत्मतत्त्व

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात जीवन जगणाऱ्या माणसाची नाडी ओळखली, प्रगत समाजातील प्रश्न त्यांनी पाहिले आणि विज्ञानाची घोडदौड जाणून घेतली. संत परंपरेचा मूळ धागा न सोडता त्यांनी-‘अध्यात्म और विज्ञान से सब हो सुखी सहयोग समता से यह सृष्टी बने स्वर्गही’ अशी गुरुदेवाला विनम्र प्रार्थना केली. […]

चार प्रकारचे राम

कबीर साहेबांनी भक्तीसाठी ज्या चार रामाचे मार्गदर्शन केले ते सर्व आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या साधकासाठी पथदर्शकाचे काम करणार आहेत. राम शब्दाला प्रतीकरूप मानून त्यांनी भक्ती करणाऱ्या सर्व साधकांना स्पष्ट इशारा (चेतावणी) दिला आहे की तुम्ही कोणत्या रामाची भक्ती करण्यात मग्न झाले आहात. […]

शब्द सूरती योग

संत कबीरांच्या मते आत्मा अगम्य आहे. तो सांसारिक आणि भौमिकतेचा विषय नाही. तो आपल्या चर्म चक्षूने पाहण्याचा अथवा फक्त कानाने ऐकण्याचा विषय नाही तर दिव्य दृष्टीने अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यांनी साधकांना ज्योती स्वरूपाच्या दर्शनात न थांबता पुढे नाम निःअक्षर (परमात्मा) पर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिलेला आहे. […]

शब्द बापुडे केवळ वारा

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणून ओळखली जातात. पैकी पृथ्वीच्या आधारानेच सगळे जीवन चालते आणि आप म्हणजे पाणी हे तर मूर्तीमंत जीवनच. तेजोमय लोहगोल म्हणजे भगवान् सूर्यनारायण वायू आणि आकाश या दोन गोष्टींचा संदर्भ सहजासहजी लागत नाही. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..