तोंडावाटे द्रवरूप औषध घेताना घ्यावयाची काळजी
सोल्युशन (द्रावण), सिरप, लिंक्टस, सस्पेंशन, ड्रॉप्स (थेंब) अशा रुपात तोंडावाटे घ्यावयाची द्रव औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे सेवन करताना खालील काळजी घ्यावी. या औषधांचा योग्य डोस पोटात जाण्यासाठी बाटलीवरील मापाचा कप वा मापाचा चमचा वापरणे आवश्यक आहे. साधारणतः ही औषधे ५ मिलि. म्हणजे १ टिस्पूनच्या पटीत असतात. मापाच्या कप/ चमच्यावर ५ मिलि., ७.५ मिलि., १० मिलि. […]