नवीन लेखन...

खांदा (Sholder Joint)

खांद्याच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणता येईल. फऱ्याच्या हाडाच्या उखळीत- दंडाच्या हाडाचे डोके (ह्युमरल हेड) (स्क्युँपुला) फिरते व हा सांधा तयार होतो. परंतु ही उखळ फारच कमी खोल, अधिक पसरट असल्याने दोन गोष्टी होतात. १) या सांध्याच्या हालचाली अधिक व्यापक व सर्व बाजूनी गोलाकार (ग्लोबल) होऊ शकतात- हा फायदा २) उखळ फारच पसरट असल्यामुळे हा खांदा कमी-जास्त, […]

अमिबाजन्य विकार

जगातील अंदाजे १० टक्के लोकसंख्या अमिबाजन्य विकाराने बाधीत आहे. अमिबाजन्य विकार एष्टअमिबा हिस्टोलिटिका या अंतःपरजीवीमुळे होतो. माणसात याचा संसर्ग अन्नावांटे होतो. चार केंद्रके असलेली याची पुटी (सिस्ट) बाधीत अन्न व पाण्याद्वारे पोटात जाते. माशा, झुरळे यांच्यामुळे रुग्णाच्या विष्ठेतील अमिबाच्या पुटी अन्न व पाण्यात पसरतात. साधारणपणे जगातील ४० ते ५० लाख लोकांना याची लागण होते व ४० […]

दूषित अन्नपाण्यातून होणारे आजार – (२)

टायफॉइड- उलट्या होणे, पोट दुखणे आणि मुख्यतः ताप येणे ही टायफॉइडची लक्षणे. तापाची तीव्रता काही रुग्णांमध्ये कमी असते तर काहींमध्ये अगदी थंडी भरून खूप ताप येतो. थकवा खूप येतो. खोकलाही असू शकतो. सहसा हा आजार जीवघेणा नसतो, पण बरा होण्यासाठी बरेच दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. औषधांना दाद न देणाऱ्या टायफॉइडमध्ये दहा ते चौदा दिवस शिरेतून […]

वंध्यत्व

नलिका बालक (टेस्टूब बेबी) इनव्हिट्रो फरटिलायझेशन ॲण्ड एम्ब्रियो ट्रान्स्फर. १९७८ साली डॉ. रॉबर्ट एडवर्ड आणि डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांनी ल्युईस ब्राऊन या नलिका बालिकेला जन्माला घातले आणि त्याबरोबरच एक नवीन युग सुरू झाले. स्त्री बीजाचे शुक्रजंतूंशी (पु. बीजाशी) फलन हे गर्भाशय नलिकेत होते; पण जर नलिका बंद असतील तर? यावर मात करण्यासाठी डॉ. एडवर्डनी एक नवा […]

फास्टफूडचे दुष्परिणाम (भाग – २)

(४) फास्ट फूडमधील तुपामध्ये ‘ट्रान्स फॅट्स’ नावाची फास ‘दयाला हानीकारक द्रव्ये असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून ‘दयरोगाला आमंत्रणच मिळते. (५) मुलांना अस्थमा किंवा अॅलर्जीचा त्रास असल्यास अशा पदार्थांचा कृत्रिम रंग, फ्लेवर, प्रिझरवेटिव मुळे असे आजार बळावू शकतात. (६) फ्रेंच फ्राइज (तळलेले बटाट्याचे चिप्स) हे तापमानाला तळले जातात. त्यामुळे त्यात हे खूप उच्च ॲक्रिलमाईड नावाचे अत्यंत […]

फास्टफूडचे दुष्परिणाम (भाग १)

भरपूर कॅलरीजच्या जोडीला या पदार्थांमध्ये जास्त फास् प्रमाणात मीठ वापरले जाते. पदार्थ जास्त काळ टिकविण्यासाठी कृत्रिम असे प्रीझरवेटिव वापरले जातात. हे पदार्थ आकर्षक दिसावेत व चवीला चांगले लागावेत म्हणून त्यात कृत्रिम रंग व फ्लेवर वापरले जातात. जास्तीचे मीठ, रंग, फ्लेवर, प्रीझरवेटिव हे आपल्या शरीरासाठी योग्य नव्हे. असे पदार्थ थोड्या प्रमाणात जरी खाल्ले तरी त्यातून भरपूर प्रमाणात […]

फास्टफूड किंवा जंकफूड म्हणजे नक्की काय ?

ज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात. हे पदार्थ नैसर्गिक अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून रिफाइन करून बनविले जातात. फास्टफूडची उदाहरणे म्हणजे बटाट्याचे तळलेले चिप्स, फ्रेंच फ्राइज, बर्गर, चीझ पिझ्झा, (कारबोनेटेड) बाटलीबंद शीतपेय, इन्सटंट नूडल्स, बेकरीचे पदार्थ- (क्रीम) बिस्किट, कुकीज […]

डॉ. सॅम्युअल हनेमन – होमिओपॅथीचे जनक (उत्तरार्ध)

रोग्यावर उपचार म्हणजे संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य साधणे अशी डॉ. हनेमन यांची मनोधारणा होती. याच सुमारास ‘कुलन’ नावाच्या शास्त्रज्ञाने सिंकोना बार्क या वनस्पतीमध्ये काही ठराविक रोग बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे सिद्ध दलदलीच्या जागी उगवणाऱ्या केले. सिंकोना या वनस्पतीच्या सेवनाने स्वतःमध्ये झालेले बदल व वयोमानानुसार होत असलेले बदल सारखेच असल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले. यावरून डॉ. हनेमन यांनी अनुमान […]

रसायने व कर्करोग

कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या प्राकृतिक व जैविक घटकांप्रमाणे काही रासायनिक पदार्थांचासुद्धा कर्करोगाशी संबंध असू शकतो. जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी जॉन हिल या इंग्लिश डॉक्टरला असे आढळले, की तंबाखूपासून बनविलेली तपकीर नाकाद्वारे ओढणाऱ्या व्यक्तींना नाकाच्या आतील भागात अर्बुदे होतात. या सौम्य अर्बुदांचे रुपांतर कर्करोगात होते हे त्यांना उमजले. ज्या काळी कर्करोगाबद्दल कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नव्हती त्या काळात जॉन […]

कर्करोगाची लक्षणे (भाग २)

आनुवंशिकतेशी संबंध असलेला दुसरा कर्करोग म्हणजे डोळ्याचा कॅन्सर. डोळ्यातील नेत्रगोलाच्या मागे प्रकाशाची संवेदना जाणणारा एक पटल असते. यास रेटिना असे म्हणतात. या पटलाच्या उतीतील पेशीत होणाऱ्या कर्करोगास रेटिनोब्लास्टोमा असे म्हणतात. ज्या मुलांना रेडिनोब्लास्टोमा किंवा आरबी जनुक आनुवंशिकतेने प्राप्त होतो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना कर्करोग होतो. ‘श्वास’ या चित्रपटात या रोगाचे हृदयस्पर्शी चित्रीकरण बघायला मिळते. एका कुटुंबातील काही […]

1 2 3 4 5 6 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..