कर्करोगाची लक्षणे (भाग १)
स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग नियमितपणे स्तनांची चाचपणी केल्यास स्वतःलाच कळून येतो. दोन्ही स्तन व स्तनाग्रे हाताने चाचपल्यास कर्करोगाची नुकतीच तयार झालेली गाठ प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येते. कधी कधी अन्न गिळताना अचानक अन्ननलिकेत अडथळा होतो. अन्ननलिकेत कर्करोगाची गाठ झाल्यास अन्न घशातून पुढे सरकत नाही. असे झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरीचे ठरते. क्वचित शरीरातील आतील भागात उदा. […]