बालपणातील खुब्याच्या सांध्यांचे विकार
जन्मतःच काही मुले खुब्यातील सांधा निखळलेल्या अवस्थेत जन्मतात. याची कारणे अनेक आहेत; परंतु पायाळू जन्मलेल्या मुलांमध्ये असा प्रकार असण्याची शक्यता अधिक असते. मुख्यत्वे उखळ व्यवस्थित तयार न झाल्याने असा प्रकार संभवतो. याचे निदान अनुभवी डॉक्टरच करतात. कारण क्ष-किरणांद्वारे नवजात अर्भकामध्ये याचे निदान करता येत नाही. त्वरित योग्य निदान आणि उपचार सुरू करावे लागतात. पूर्वी या सांध्याला […]