लहान वयातील कोपराजवळील अस्थिभंग
कोवळ्या वयात लहान मुले पडल्यावर कोपराजवळ अस्थिभंग होणे हे अगदी नेहमीचे आहे. कोपराजवळ सांध्याच्या एक इंचावर हे हाड खूप पातळ असल्यामुळे ते सहजच तुटते. क्ष-किरणाने याचे निदान होते; परंतु त्याच वेळी आसपासच्या रक्तवाहिन्यांना इजा झाली असल्यास ते पडताळून पाहावे लागते. पूर्वी या अस्थिभंगाची योग्य उपाययोजना न झाल्याने हात कोपराजवळ वाकडा वाढत असे. कोपराला मालिश केल्याने जरी […]