नवीन लेखन...

हाडांची रचना

प्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच. माणसाचे हाड हा एक खास भाग आहे. […]

प्रदूषित पाणी प्यायल्यामुळे काय अपाय होतात ?

स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी ही पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे. तरीही असे आढळून आले आहे की, जगात आज अनेक लोक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. म्हणूनच दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगराईचे प्रमाण वाढतच आहे. पाण्याचे प्रदूषण मुख्यतः सूक्ष्म जिवाणू आणि रासायनिक टाकाऊ पदार्थांमुळे होते. हानीकारक सूक्ष्म जिवाणूंमुळे ज्या ठिकाणी पाणी दूषित होते त्या ठिकाणी आतड्याचे रोग जसे […]

मासिक पाळी का व कशी ?

मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर एक वेगळा जीव म्हणून बाळ जगू लागते. त्याच्या शरीरातील श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था इत्यादि संस्था आपले कार्य सुरू करतात. फक्त जननसंस्था मात्र बाळ मोठे होईपर्यंत कार्यरत नसते. मुलगी मोठी होऊ लागली, की तिच्या शरीरात बदल होण्यास सुरुवात होते. बाह्यात्कारी बदल आपल्या दिसतात, तसेच पोटातही बीजांडग्रंथी, गर्भाशय यांची वाढ होते. त्यासाठी तिच्या शरीरात […]

डॉ. सॅम्युअल हनेमन – होमिओपॅथीचे जनक (पूर्वार्ध)

डॉ. सॅम्युअल हनेमन हे होमिओपाथी या वैद्यकशास्त्राचे जनक होते. त्यांचा जन्म १७५५ साली झाला. त्या काळात वैद्यकीय उपचारांसाठी विविध पद्धती प्रचलित होत्या. अशावेळी डॉ. हनेमन यांनी वैद्यक हे शास्त्रोक्त पद्धतीच्या चौकटीत कसे बसवता येईल याचा शोध घेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. वेगवेगळे सिद्धान्त सिद्ध होत होते. समाजात प्रचलित असलेल्या या अनेक पद्धती वापरताना त्यात शास्त्रीय दृष्टिकोन […]

पुरुषांमधील टक्कल

एखाद्याचं व्यक्तिमत्त्व केसांमुळे अधिकच खुलून येतं असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरणार नाही. त्यामुळेच केस गळणं हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो. बघता बघता डोक्यावरील केस गळायला लागतात आणि लवकरच, टक्कल पडण्याची भीती वाटायला लागते. साधारणतः डोक्यावर असलेल्या केसांमधील १० टक्के केस गळणं हे तसं स्वाभाविक मानलं जाऊ शकतं. हे केस गळण्याआधी ‘गळण्याच्या स्थितीत’ असतात. तीन […]

औषधांच्या दुनियेत

आधुनिक जगात औषधे ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. भारतासारख्या महाकाय देशात औषधांची निर्मितीही अवाढव्य आहे आणि आज आपल्याकडे जवळपास १ लाख औषधे उत्पादने उपलब्ध आहेत. बदलत्या काळात जसे वैद्यक व औषधशास्त्र प्रगत होत गेले तसे औषधांचे स्वरूप, प्रकार, ती वापरण्याच्या पद्धती यात प्रचंड वैविध्य व नावीन्य आले आणि ही आधुनिक औषधे योग्यपणे वापरण्याची ग्राहकांवरची […]

औषधांची साठवण कशी करायची

औषधांची परिणामकारकता व सर्व गुणधर्म जपण्यासाठी त्यांची घरात योग्य ठिकाणी साठवण करणे आवश्यक असते. सूर्यप्रकाश, उष्णता, दमटपणा, पाणी यामुळे औषधांचे विघटन होऊन मुदतीआधीच ती निरुपयोगी होऊ शकतात. म्हणूनच खिडकीत, फ्रीजवर, टी. व्ही. वा ओव्हनवर, गॅसजवळ, किचन टेबलवर (चटणी, लोणच्यांच्या सोबत), बाथरूममध्ये, बेसीनजवळ अशा ठिकाणी औषधे ठेवू नयेत. कोरड्या व थंड ठिकाणी औषधे ठेवणे उत्तम. शक्यतो घरातील […]

अंगावरच्या पुरळासह येणारे ताप

कांजिण्या: प्रत्यक्ष लागण झाल्यापासून दहा ते सतरा दिवसांत होणारा हा विषाणूजन्य आजार आपल्या ओळखीचा आहे. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसणारा हा आजार मोठेपणीही होऊ शकतो; पण एकदा होऊन गेला असेल तर सहसा पुन्हा होत नाही. हवेतून, प्रत्यक्ष स्पर्शाद्वारे किंवा हाताळलेल्या वस्तूंद्वारे विषाणू पसरतात. एखादा दिवस ताप, भूक मंदावणे, सर्दी अशी |लक्षणे दिसल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाण्यासारखे फोड छाती-पोटावर […]

मलेरिया

मलेरिया हा प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. मलेरियाचा उल्लेख इजिप्तच्या फॉरोंमध्ये व चरक संहितेतही सापडतो. आधुनिक युगात सर रोनॉड रॉस या ब्रिटिश भारतीय सेनेच्या डॉक्टांनी मलेरिया डासांद्वारे पसरतो हे सिद्ध केले. व्हायव्याक्स, फॉलसिपॉरम, ओव्हेल व मलेरिए हे प्लासमोडियम प्रजातीचे चार मुख्य प्रकार आहेत. भारतात व्हायव्याक्स व फॉलसिपॉरम सर्वात अधिक प्रमाणात आढळून येतात. प्लासमोडियम […]

डेंग्यू

डेंग्यू हा उष्णकटीबंधात आढळणारा तापाचा प्रकार आहे. हा आजार फ्लेविवायरस या प्रजातीच्या विषाणूंमुळे होतो. एडीस प्रजातीच्या डासांमुळे हा आजार माणसांमध्ये पसरतो. डेंग्यू ताप असलेल्या रुग्णाला चावल्यामुळे हा विषाणू डासात जातो. हे डास सकाळच्या वेळी माणसांना चावतात आणि आजार पसरतो. या तापाची लक्षणे निराळी आहेत. एके दिवशी अचानक खूप डोकेदुखी, हातपायदुखी, सांधे-| कंबरदुखी सुरू होते आणि नंतर […]

1 6 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..