डीएनए आणि अमिनो आम्ल
डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो. […]