नवीन लेखन...

फौजदार

  एकोणिसशे ऐंशीचा तो काळ. नुकताच कोल्हापूरमध्ये दाखल झालेलो होतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना-घडामोडी इतक्या होत्या, की बातम्या लिहिताना दमछाक व्हावी. त्यात निवडणुकीचे दौरे, प्रत्यक्ष मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भेटीगाठी असं बरंच काही सुरू होतं. अचानक एके दिवशी मुख्य कार्यालयातून फोन आला. सांगली भागाचा दौरा करून या वसंतदादांच्या दौर्‍याचा वृत्तांत द्या. त्यावेळी माझी सारी मदार स्कूटरवर असायची. कोल्हापूर-सांगली […]

गरीब आणि गरिबी

  एकदा एका थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता गरिबी. खरं तर ‘गरिबी’ या शब्दाशी ज्यांचा त्यांच्या अल्पशा हयातभर संबंध आला असल्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षकांना वाटत होते, की आपले विद्यार्थी ‘गरिबी’ या विषयावर उत्तम लेखन करू शकतील. स्पर्धा झाली. निबंध झाले. त्यांचे परीक्षण झाले आणि एका मुलाला […]

कंट्रोलर

त्या वेळी मी नुकताच जपान दौर्‍याहून परतलो होतो. जपानमध्ये वावरताना तेथील महागाईचा विचार मनात असे अन् स्वाभाविककपणे सारे हिशोब रुपयांत होत असत. पुण्याला आल्यानंतर रस्ते, वाहतूक इथली आणि स्वच्छता, टापटीप, शिस्त या बाबी जपानच्या, अशी तुलना सतत होत असे. एका अर्थानं मी पुण्यात सरावत चाललो होतो. ‘हे असंच चालायचं’ हे वाक्य जवळचं वाटू लागलं होतं. त्या […]

सकारात्मकता

परमेश्वराचं अस्तित्व हा सातत्यानं चर्चिला जाणारा विषय. कोणी ते सहजी मान्य करतात, तर कोणी बिलकूल नाही. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी भरपूर उदाहरणं असतात. काही विज्ञानावर सिद्ध करता येतात, तर काही विज्ञानासाठीही गूढ. नेमकं काय असावं? विचार करायला लागलो, की प्रश्नांची भेंडोळी पुढे सरकत राहतात अन् उत्तरं… उत्तरं सापडली तर मग प्रश्नाचं अस्तित्व राहिलं असं कसं म्हणता […]

दर्जा

  मी त्यावेळी जपानच्या दौर्‍यावर होतो. भारत आणि जपानच्या सांस्कृतिक विभागांनी एकत्रितपणे त्याचं आयोजन केलं होतं. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत हा देश भौगोलिकदृष्ट्या पाहणं शक्य होतं; पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याचा परिचय होणं हे कठीण होतं. तरीही प्रयत्न सुरू होता. रोज किमान तीन भेटी असा कार्यक्रम असायचा. त्यातही प्रामुख्यानं संग्रहालये असत. काही भेटी मी भारतात असतानाच निश्चित केलेल्या होत्या […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..