मिटलेलं पान
तुटलेल्या नात्यांचे जरतारी पदर त्या ना मायेची उब प्रेमाची कदर गाठीगाठीत फक्त बोचरे आठव कशास मिरवायचे? भरजरी पाटव !……… १ तो पाठीवर हात अन डोळ्यात पाणी ते तुडुंबलेलं मन श्वासात गाणी क्षणाक्षणाने दिलं जीवनाचं दान उघडेल का कोणी ते? मिटलेलं पान !………… २ …..मी मानसी