नवीन लेखन...

‘तू’

क्षणी पालटली कळा तूझा हात हाती आला माझा रुतु बदलला।।१।। नवा उगवला दिस तुला बांधुनिया पाशी भिरभिरे अवकाशी।।२।। काही उरले ना काज तुझा ध्यास निशीदिनी तुच स्वप्नी जागेपणी।।३।। जीव भारलेला असा तुझ्या नावाच्या पुढती सारी संपतात नाती।।४।। भान काळाचे नुरले आता आयुष्य ते किती तुझ्या श्वासांची गणती।।५।। …….।।मी मानसी।।

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..