नवीन लेखन...

सूर्योदय

  प्रभात झाली रवी उगवला दाही दिशा उजळल्या रात्रीचा अंधार जावूनी नवीन आशा अंकूरल्या   १   बरसत आहे सूर्यकिरणे पृथ्वीच्या भूतली आनंदाने पुलकित होवून धरणीमाता शहारली   २   निघूनी गेला रात्रीचा गारवा त्याच्या आगमानाने उल्हासीत होवून प्राणी जीवन नाचत राही ऊबेने   ३   पुनरपि आता झाले सुरु चक्र जीवनाचे मिळवू आज काही तरी किरण चमकती आशेचे […]

भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण देवा   ।।धृ।।   देह झुकला पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण  देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते मनां मनाचा ताबा देहावरी तेच तुजला प्रणाम करी घे प्रभू जाणूनी   अत:करणातील ठेवा   २ कर पडले चरणी […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला   प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला   सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर, […]

निसर्ग स्वभावाचे दर्शन

बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता, […]

दोन मनें दे प्रभू

इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची ऐकून घे कहाणी,  अडचणींची   ।। नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां तप:साधने   ।। संसार पाठी, लावलास तूं गुरफटून त्यांत,  साध्य न होई हेतू  ।। मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार  ।। दे प्रभू ,मनाची एक जोडी संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी   […]

रेणूके जगदंबे आई

रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।   तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला   जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे आई […]

आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com                                                           […]

मातृत्वाची कन्येस जाण

आई होऊन कळले मजला, कष्ट आईचे आज खरे  । स्वानुभवे जे जाणूनी घेई, तुलना त्याची कोण करे ।।१।।   नऊमास तू जपला उदरी, क्षणाक्षणाला देऊनी शक्ती  । बाह्य जगातून शोषून सारे, सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।   देहावरी आघात पडता, झेलूनी घेई सारे कांहीं  । बाळ जीवाला बसे न धोका, हीच काळजी सदैव राही ।।३।।   […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली  ।।१।।   शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी  । विजयी झाले ऋणानुबंध, बांधले होते हृदयानी  ।।२।।   उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा  । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।।३।।   मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक […]

1 6 7 8 9 10 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..