नवीन लेखन...

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करीत  । लक्ष्य त्यांचे फूलपाखरू, फुलाभोवती होते खेळत ।।१।।   भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी  । शोषीत असता गंध फुलांतील, चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।   व्याघ्र मावशी मनी  , म्याँव म्याँव करीत आली  । उंदीर मामा दिसता तिजला, झेप घेण्या टपून बसली ।।३।।   शंका येता त्याला […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे । लक्ष्य वेधूनी घेतां घेतां, फसवित होते आम्हांस सारे ।।१।।   कधी जाती चटकन मिटूनी, केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी । खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी ।।२।।   एक एक जमती नभांगी, धरणीवरल्या मांडवी अंगीं । संख्या त्यांची वाढतां वाढतां, दिसून येती अनेक रांगांनी ।।३।।   हसतो कुणीतरी […]

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी, बांधून गेल्या घरटे  । खेळूनी नाचूनी, चिव चिव गाणे गात वाटे  ।।१।। झाडावरती उंच बसूनी, रात्र घालवी हलके हलके  । दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके  ।।२।। संसार चक्र  भोवती पडता, गेल्या दोघी त्यातच गुंतूनी  । नव पिल्लाच्या सेवेसाठी, घरटे केले काड्या आणूनी  ।।३।। पिल्लांना त्या पंख फुटता, उडूनी गेल्या घरटे […]

निसर्गाचे मार्ग

आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे  । त्या वाटेवरी चालत रहा, आवाहन त्याचे ।।१।। चालत राहती जे जे  कुणी, त्यावरी विसंबूनी  । यशस्वी होती तेच जीवनी, समाधान लाभूनी ।।२।। कर्ता समजूनी काही काही, अहंकारी होती  । सुख- दु:खाच्या चक्रामध्ये, तेच सापडती ।।३।। भटकत जाती भिन्न मार्ग, काही कळापरि  । परिस्थितीचे चटके बसता, येती वाटेवरी ।।४।। हिशोबातील तफावत […]

निसर्गाचे मार्ग वेगळे

मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ  । चालतो त्याच दिशेने,  जसजशी येते वेळ ।।१।। चालत आसता थांबे,  भटके वाट सोडूनी  । करूया काही आगळे  ठरवी  विचारांनी ।।२।। आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे  । नियतीची वाट मात्र,  त्या दिशेने जात नसे ।।३।। परिस्थितीचे कुंपण,  टाकले जाते भोवती  । कळत वा नकळत,  मार्गी त्यास खेचती ।।४।। […]

स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला आवडते भावते कल्पनेचे राज्य जरी, आनंददायी वाटते….II धृ II तव प्रतिमा मनी बसवली, आठवण सदैव येऊ लागली  । जागेपणी मिळे न मजला, स्वप्नी सारे तेच अनुभवते…….१ स्वप्न मजला आवडते , पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे  । हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२ स्वप्न मजला आवडते , कल्पना, भाव- […]

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला, थोटके का भासते  । झेप घेण्या पंख फुटतां, हाती येईल काय ते ?।।१।।   उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते  । चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ? ।।२।।   अथांग सागर खोल जरी , डूबकी घ्यावी वाटते  । जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते? ।।३।।   काव्य […]

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे, कष्ट सोसले शरिर मनानें,  चीज त्याचे झाले दिसे ।।१।। बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने, यश ना पडले पदरी.  पाठ फिरविली नशीबाने ।।२।। निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती, शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती ।।३।। लिहिता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता, छंद […]

देहातील शक्ती

नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा  । थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते  ।।१।। अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून  । भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती  ।।२।। आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते  । भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोमी पुलकित होते  ।।३।। अवयवे सारी स्फूरुनी जाती,  देहामधूनी विज […]

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

1 7 8 9 10 11 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..