अस्सल नाट्यधर्मी वि. रा. परांजपे
वेगवेगळ्या निमित्ताने ठाण्यातील हौशी, उत्साही नाट्यवेड्यांना एकत्र आणून त्यांचे नाट्यप्रवेश बसविणे, त्यांना अभिनयाचे मार्गदर्शन करणे हा जणू परांजपेसरांचा ध्यासच होता. 1996 साली नटवर्य मामा पेंडसे यांच्या स्मृती जागविताना परांजपेसरांनी स्वत ‘खडाष्टक’ आणि ‘भाऊबंदकी’मधला जो प्रवेश सादर केला, तो पाहून ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर यांनी ‘अविस्मरणीय’ अशी दाद दिली होती. […]