MENU
नवीन लेखन...

जगभरातले काही महाकाय रेल्वे प्रकल्प

१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका) तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला ‘ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग’ म्हणून ओळखलं […]

मुंबई-पुणे: रेल्वे प्रवास

१८५३ मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली तरी पुणं गाठणं कठीणच होतं. याचं कारण होतं, मधला अजस्र खंडाळा घाट. त्या काळात बग्गीतून किंवा घोड्यावर बसून मुंबई-पुणे प्रवास ३-४ दिवसांत पुरा केला जाई. सन १८३१ मध्ये मुंबई-पुणे पत्रं पाठविण्याची पोस्टाची सोय होती. या प्रवासास ४८ ते ७२ तास लागत. घोडे व बैलगाड्यांच्या मदतीनं भारतभर पत्रे पाठविण्याची […]

थोर व्यक्ती आणि रेल्वे

महात्मा गांधींना दक्षिण अफ्रिकेत रेल्वेने प्रवास करत असताना फारच कटू अनुभव आला होता. ते फर्स्ट क्लासच्या डब्यामधून प्रवास करत असताना त्यांच्या डब्यात एक गोरा माणूस चढला. ‘भारतीय काळा माणूस माझ्याबरोबर प्रवास करण्यास धजतोच कसा?’ असं म्हणून गांधीजींना सामानासकट डब्यातून ढकलून देण्यात आलं होतं. या घटनेचे गंभीर पडसाद त्यांच्या पुढील जीवनातील विचारसरणीत पडले. आफ्रिकेतून भारतात परतल्यावर आपला […]

भारतीय रेल्वेचे गाढे अभ्यासक – एस. वेंकटरामन

एस. वेंकटरामन हे नव्वद वर्षांचे गृहस्थ खरे रेल्वेप्रेमी. १९२५ साली वयाच्या आठव्या वर्षी मद्रात ते विजयवाडा असा पहिला रेल्वेप्रवास त्यांनी केला. तेव्हापासून त्यांचं आयुष्य रेल्वेशी जोडलं गेलं आहे. रेल्वेत मटिरियल मॅनेजर म्हणून हुबळी, वाराणसी, अशा विविध गावांत त्यांनी काम केलं. रेल्वेमधून निवृत्त झाल्यावर ‘Indian Railways at a glance’ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. गेली ३० […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..