डॉ. वामन रामचंद्र कोकटनूर (१८८७-१९५०)
पूर्वीच्या मुंबई प्रांतातील अथणी (आता कर्नाटकात) येथे जन्मलेल्या कोकटनूर यांनी बीएस्सी केल्यावर पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेत रसायनतज्ज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. नंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व ते कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरी पुढील शिक्षणासाठी गेले. बटाट्यावर संशोधन करण्यासाठी ते तेथे गेले होते. पण त्या वर्षी पीक बुडाल्याने त्यांना करता संशोधन आले नाही आणि शिष्यवृत्ती परत करावी […]