माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत. […]