संस्कारित जीवन
भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत. […]