श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३
स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् | जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖ भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात. आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत […]