श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – १
कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं, नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् | नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां, त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१|| भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी. बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते. या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती […]