नवरत्नमालिका – ७
सर्वच देवतांना प्रिय असणारे पुष्प म्हणजे कमळ. चिखलात जन्माला येऊन सूर्याच्या तेजाच्या दिशेने झेपावण्याची त्याची वृत्ती. त्यावर गुंजारव करणार्या भ्रमरांचा शब्द, त्याचा कोमल स्पर्श, त्याचे अत्यंत आकर्षक रूप, त्यामध्ये असणाऱ्या मकरंदाचा रस आणि त्याचा नितांत मनोहारी गंध. अशा पाचही अंगाने आनंद देणारे हे पुष्प. आई जगदंबा तशीच सर्वांगसुंदर आणि सर्वांगाने आनंद देणारी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा देताना आचार्य श्री म्हणतात, […]