श्री मीनाक्षी पंचरत्नम् – १
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां बिम्बोष्ठीं स्मितदन्तपंक्तिरुचिरां पीताम्बरालंकृताम् । विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्वस्वरूपां शिवां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ १॥ मीन म्हणजे मासोळी. अक्ष म्हणजे डोळे. जिचे डोळे मासोळी प्रमाणे लांब, दोन्हीकडे निमुळते, त्यातही कानाकडे अधिक वाढलेले आणि मध्यभागी विशाल असतात ती मीनाक्षी. मासोळीचे डोळे टपोरे असतात. तसे जिचे नेत्र ती मीनाक्षी. अशा प्रकारच्या सुंदर नेत्रांनी सुशोभित आई जगदंबे चे […]