गौरीदशकम् – १
लीलालब्धस्थापितलुप्ताखिललोकां लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् । बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १॥ आई जगदंबेच्या शुद्ध सात्विक स्वरूपाला गौरी असे म्हणतात. तिचा गौरवर्ण तिच्या सात्विकतेचे ,शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. या आई जगदंबेचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, लीलालब्धस्थापित लुप्ताखिललोकां- भगवान ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी म्हणजे कल्पांती ही चवदा भुवनात्मक सृष्टी विलोप पावते. पुन्हा नवीन कल्पात अर्थात श्री ब्रह्मदेवांच्या नवीन दिवसाच्या […]