श्री भ्रमरांबाष्टकम् – ६
लावण्याधिकभूषिताङ्गलतिकां लाक्षालसद्रागिणींसेवायातसमस्तदेववनितां सीमन्तभूषांन्विताम्। भावोल्लासवशीकृतप्रियतमां भण्डासुरच्छेदिनीं श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।६।। लावण्याधिकभूषिताङ्गलतिकां- लावण्या मुळे जिची अंगलतिका अधिकच सुशोभित झाली आहे अशी. सौंदर्य म्हणजे अवयवांचे प्रमाणबद्ध स्वरूप. त्याने व्यक्ती सुंदर दिसते. मात्र ही प्रमाणबद्धता लहान लेकरा पासून वृद्धा पर्यंत असू शकते. तारुण्याच्या काळात त्यात येणारे विशेष आकर्षण म्हणजे लावण्य. आधीच अत्यंत सुंदर असणारी आईची अंगयष्टी या तारुण्यागत लावण्याने अधिकच […]