श्री अन्नपूर्णाष्टकम् – २
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरीमुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुम्भान्तरी । काश्मीरागरुवासिताङ्गरुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥२॥ नानारत्नविचित्रभूषणकरी- संस्कृतचे जे शब्द मराठीत वेगळ्याच अर्थाने वापरले जातात त्यातील एक शब्द म्हणजे विचित्र. मराठीत तो अजब , विक्षिप्त या अर्थाने वापरतात. मात्र संस्कृतमध्ये चित्र म्हणजे विविध रंगांनी आकर्षक. तर त्याला लावलेल्या विशेष या अर्थाच्या उपसर्गाने विचित्र म्हणजे विशेष आकर्षक. अत्यंत सुंदर. आई अन्नपूर्णा अशा अनेक […]