श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – भाग ५
भगवान श्रीगणेशांच्या निवास लोकांला ‘श्रीस्वानंदलोक’ असे म्हणतात. तेथे भगवान गणेश आपल्या सहस्रदल कमळावर विराजमान असतात. त्यांच्या सेवेसाठी अष्ट महानायिका सुसज्ज असतात. […]
भगवान श्रीगणेशांच्या निवास लोकांला ‘श्रीस्वानंदलोक’ असे म्हणतात. तेथे भगवान गणेश आपल्या सहस्रदल कमळावर विराजमान असतात. त्यांच्या सेवेसाठी अष्ट महानायिका सुसज्ज असतात. […]
अनेक अवतार घेऊन शिवसुत म्हणविल्या जाणाऱ्या त्या भगवान गणाधीशांचे मी वंदन करतो. […]
भगवान गणेशांचा आवडता रंग लाल आहे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे.पण लालच का असे म्हटले तर? […]
अशा स्वरूपानेयुक्त असणाऱ्या, विविध अवतारांचा स्वरूपात शिवपुत्र असणाऱ्या भगवान श्री गणेशांची मी स्तवन करतो. […]
भगवान गणेशाचे हे स्तोत्र जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या वृत्तात रचले त्या नावानेच ते विख्यात झाले आहे. या स्तोत्राचे वृत्त आहे भुजंगप्रयात. भुजंग अर्थात सर्प. तो जात असताना ज्या प्रकारच्या वळणांचा उपयोग करतो तशी वळण घेत जाणारी ही शब्दावली. त्यामुळेच या वृत्ताला भुजंग प्रयात असे म्हणतात. […]
मुक्ती हवी माये पासून. माया ही वेडीवाकडी आहे. त्या वक्रा असणाऱ्या मायेला जे तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतात त्यांना वक्रतुंड असे म्हणतात. पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात की अशा वक्रतुंडांचे मी नित्य आदराने नमन करतो. […]
विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं! गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !! निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:! महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!! गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत. आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप? विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान […]
त्या सर्व ब्रह्मांचे अधिपती, जे ब्रह्मणस्पती श्री गणेश ते गजेंद्ररुपिन् होत. अशा श्रीगणेशांचे मी भजन करतो. […]
आपल्या आराध्य देवतेच्या सौंदर्याने विमोहित होणे ही भक्तांची आवडती गोष्ट. त्या देवतेच्या सौंदर्य वर्णनाने स्तोत्र वाङ्मय मोहरून येते. या श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री भगवान श्री गणेशांच्या विविध अलंकारांचे वर्णन करीत आहेत. […]
गाणपत्य संप्रदायात स्वानंद नामक गणेशाच्या लोकात तथा साधकाच्या ब्रह्मरंघ्रातील सहस्त्रदल कमलात भगवान गणेशांचे आसन वर्णिले आहे. त्या सिंधुरानन अर्थात गजमुखी भगवान गणेशांचे मी भजन करतो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions