MENU
नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ५

तेव्‍हां आपण स्‍वतःवर, आपल्‍या संस्‍कृतीवर आणि पर्यायानें आपल्‍या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्‍हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की –
हिचे पुत्र आम्‍ही, हिचे पांग फेडूं | वसे आमुच्‍या मात्र हृद्मंदिरी || जगन्‍मान्‍यता हीस अर्पू प्रतापे | हिला बसवू वैभवाच्‍या शिरीं ।। […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३

एक गोष्‍ट आम्‍ही ध्‍यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्‍या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्‍येने त्‍याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं. अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – अ

आपण भाषेच्‍या शुद्धपणाचा परकीय भाषेच्‍या संदर्भात विचार केला. आतां आपण त्‍याचा विचार लोकभाषेच्‍या दृष्‍टीकोनातून करूं या. त्‍यावरून पाहूं या, इंग्रजी भारतीय भाषांचं अस्तित्‍व नाहीसं करून टाकील, असा निष्‍कर्ष निघतो कां तें.  आपण आधी पाहिलंच आहे की जी लोकभाषा असते, ती टिकून राहते, कारण ती जनसामान्‍यांची भाषा असते. तिला प्रतिष्‍ठा असो वा नसो, पण तिचं अस्तित्‍व टिकून राहतं. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ड

आमची संस्‍कृती नष्‍ट होत चालली आहे असं आमचे विचारवंत म्‍हणतात. पण इतिहास वेगळंच चित्र दाखवतो. परदेशी विद्वानही म्‍हणतात की भारतीय वांशिक समुह आपल्‍या संस्‍कृतीचं वेगळेपण नेहमी जपत असतो. म्‍हणूनच आमची संस्‍कृती व आमची भाषाही नष्‍ट होण्‍याचा पुढलया शतकात तरी कांहींहीं संभव दिसत नाहीं. […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – क

ज्‍या इंग्रजीच्‍या आक्रमणाची आपल्‍याला एवढी धास्‍ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्‍द इतर भाषांमधून मुक्‍तपणे घेतले आहेत आणि त्‍यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ). […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – अ-१

टीप – १९९०च्या दशकाच्या मध्यावर , वडोदरा — बड़ोदा — येथें भरलेल्या ‘गुजरात मराठी साहित्य संमेलना’त, प्रस्तुत लेखकानें हा ‘पेपर’ — प्रबंध — वाचला होता. आज पंचवीसएक वर्षांनंतर, त्यावर, आजच्या परिस्थितीनुसार भाष्य करण्यांसाठी एक नवीन लेख यथावकाश लिहिला जाईल. तूर्तास, ही पुनर्भेट..  […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..