नवीन लेखन...

बंदीस्त करा मनाला

वातावरणी वस्तू पडतां,  नाश पावते लवकर ती हवा पाण्याच्या परिणामानें,  हलके हलके दूषित होती ठेवूं नका उघडयावरती,  वस्तू टिकते निश्चीतपणे दूषितपणाला बांध घालता,  कसे येई मग त्यात उणे बाह्य जगातील साऱ्या शक्ति,  आघात करती मनावरी दुषिततेचे थर सांचूनी,  मनास सारे दुबळे करी देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य […]

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं,   रंगात आला खेळ मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ…..१,   खेळाच्या कांहीं क्षणी,  टाळ्या शिट्या वाजती आनंदाच्या जल्लोषांत,  काही जण नाचती…२,   निराशा डोकावते,  क्वचित त्या प्रसंगीं, हार जीत असते,  खेळा मधल्या अंगी….३,   सुज्ञ सारे प्रेक्षक,  टिपती प्रत्येक क्षण खेळाडू असूनी ते,  होते खेळाचे ज्ञान….४,   मैदानी उतरती,  ज्यांना असे सराव जीत त्यांचीच […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे गमावून टाकी,  जाणूनी फुकाचे….१, लागत नसते,   दाम वेळेसाठीं म्हणून दवडे अकारणा पोटीं….२, वस्तूचे मूल्य ते,  पैशांनीच ठरते समज सर्वांची,  अशीच असते…३, वेडे अहा सारे,   कसे होई मूल्य वेळ जातां मग,  आयुष्य जाईल…४, वेळ दवडतां,   कांहीं न राहते सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते….५   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो,  घाण वाटली मजला अमंगल संबोधूनी,  लाखोली देई तिजला….१, संतापूनी मजवर , कान उघडणी केली तुझ्याचमुळें मुर्खा मी,  अमंगळ ती ठरली,   २ आकर्षक रूप माझे,  लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी,  केले सारे तूंच फस्त   ३ परि मिळतां तुझा तो,  अमंगळ सहवास रूप माझे पालटूनी,  मिळे हा नरकवास   ४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी,  दुर्घटना ती घडली अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले. घिरट्या घालीत काळ आला,  झडप घातली त्याने वेळ आली नव्हती म्हणूनी,  बचावलो नशिबाने अपमान झाला होता त्याचा,  सुडाने तो पेटला थोड्याशाच अंतरी जावूनी,  दुजाच बळी घेतला. डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

तमोगुण

राज्य तमाचे येथें    बाह्य जगावरती म्हणून दिसे आम्हां   विध्वंसक प्रवृती नाश करण्यासाठीं   शक्तिच हवी येथे हेच रुप शिवाचे   समजण्या अवघड जाते जागा करु देई   नविन घटनाना चक्र कसे चालेल   न मिटवता त्यांना — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदेव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात सामवतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो कार्य आत्म्याचे अपूरे होता पुनरपी पडते बंधन चक्र आत्म्याचे चालत राही मुक्त होण्याचा येई तो क्षण डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८४०

अंतर्मनातील आवाज

ध्यान लागतां डूबूनी जाई अंतर्यामीं बाह्य जगाला त्याच क्षणीं विसरतो मी चित्त सारे केंद्रित होई आत्म्याकडे दुर्लक्ष्य होऊनी देहाचा विसर पडे संवाद होता आत्म्याशी विचारा सारे आतून कांहीं आंतल्या आवाजांत  सत्याचा भाव भविष्यातील घटणाचा त्यासी ठाव नियमीत ध्यान साधना करती इतर जीवांचे प्रश्न समजती ऋषीमुनीना ध्यान शक्ती अवगत राजाश्रय मिळूनी राज गुरु ठरत प्रश्न सोडवी ध्यान […]

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे,  मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता,  दिसून येतो त्यातील अंत…..१ चैतन्यमयी जीवन असूनी,  चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील,  मृत्यूची ते चाहूल पाही….२ थांबत नसते कधीही जीवन,  अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चिर निद्रा,  विश्रांती ही भास मनीचा….३ थकून जाई शरिर जेंव्हां,  प्रयत्न करि ते विश्रांतीचा […]

1 8 9 10 11 12 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..