नवीन लेखन...

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी    आभूषणें ती अंगावरती लज्जा सारी झांकुनी टाकतां   तेज दिसे चेहऱ्यावरती   ।।१।। आत्म्यासम ती लज्जा भासे    सौंदर्य जिवंत त्याच मुळें लोप पावतां लज्जा माग ती    जिवंतपणा तो कसा कळे   ।।२।। लपले असते सौंदर्य सारे    एक बिंदुच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा   लक्ष्य घालतां उघडे करुनी   ।।३।। विकृत ती मनाची वृत्ति    स्वच्छंदीपणात ती असते […]

आकाशातील कापूस

कपाशीचे  ढिग अगणित    विखुरले  दिसती आकाशीं मानव येथें उघडा  असूनी    वस्त्र  अपुरें दिसे अंगाशी   ।।१।। कोठे आहे कापड गिरणी     वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां    त्रोटक कापड निघे कसे   ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा    लाज  राखण्या मानवाची गरिब बिचारा विवस्त्र तो    किव करावी वाटे त्याची   ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।। नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।। स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।। स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दूजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।। ओंगळपणाचे […]

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते,  हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती,  साठवण असे जलाशयाची…..१,   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,  समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी,  आम्ही आमचे ज्ञान विसरतो…..२,   एक किरण तो पूरे जहाला,  अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां,  फूलून येते ज्ञान वाहण्या…..३   डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com  

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं….१, विठ्ठल- रामाचा नाद,  गुंजन करितो येथें पवित्र वातावरण,  येण्यानी होवून जाते….२, देवण घेवण आत्म्याची,  आपसामध्यें चालती शब्द फुलांची गुंफण,  त्वरीत होऊन जाती….३, फूले देऊनी मजला,  हार गुफूंन घेतात दोघे मिळूनी तो हार,  प्रभूस अर्पूं सांगतात….४ अदृश्य असले नाते,  असावे दोघांमध्ये भाषा आत्म्याची जाणतां, […]

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं,  आठवत नाही मला रचली होती एक कविता,  त्याच प्रसंगाला जल्लोषांत होतो आम्हीं,  दिवस घातला आनंदी खिन्नतेचा विचार त्या दिनीं,  शिवला नाही कधीं नाच गावूनी खाणेंपिणें,  सारे केले त्या दिवशीं बेहोशीच्या काळामध्यें,  कविंता मजला सुचली कशी छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते प्रसंग जरी तो मरून गेला,  कविता जिवंत राहते डॉ. […]

त्यांची शाळा

आंस लागली मजला बघून याव्या त्या शाळा देहू, आळंदी, परिसर जाऊनी तो धुंडाळला कोठे शिकले तुकोबा ज्ञानोबांना ज्ञान मिळे साधन दिसले नाहीं परि तेज भासे आगळे विचार झेंप बघतां आचंबा आम्हां वाटतो कोठून शिकले सारे मनी हा प्रश्न पडतो त्यांची शाळा अतर्मनीं गंगोत्री ज्ञानाची ती वाहात होती बाहेरी पावन करी धरती डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

बाबाची आई

एक होती म्हातारी,  ती  सर्वांना धारेवर धरी उपास तापास नी सोवळ ओवळ त्रस्त केल तीन घर सगळ तिच्यापुढे चालेना कुणाच काही कारण  ती बाबांची होती आई. — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

एक सुंदरी

बस मधून चाललो होतो मी,  शेजारी होती जागा रिकामी येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका तिला बघून मनाची खुलली कलीका तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका कारण ती हासत मुरकत म्हणाली “  थोडसं, सरकता का तिकडे काका ? ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

मॉर्डन तरूण

अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे बसले एक टोळके गाडीत समोर हासत होते, खिदळत होते,  गप्पा मारीत होते, ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते. स्टेशन येताच सारे उतरले तेव्हा मी एकास विचारले “आपल नाव सांगता ?” उतरता उतरता ऐकू आले “ मी आहे मिस निता ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 9 10 11 12 13 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..