नवीन लेखन...

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे,  हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

चिठ्ठीवरला मजकूर

टेबलावर ठेवले होते बॉसने काहीतरी लिहून हाताखालच्या लोकांनी निरनिराळे अर्थ काढले त्यातून कुणास काहीच समजेना, म्हणून असिस्टटने केली विचारणा चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले मला काय म्हणावयाच होत तेव्हा, समजत नाही आता, ती आहे एक नवकविता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन परिघ

एक परिघ ते आंखले आहे विधात्याने विश्वाभोवतीं जीवन सारे फिरत असते एक दिशेनें त्याचे वरती   १ वाहण्याची ती क्रिया चालली युगानुयुगें ह्या जगतीं कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा एकांच परिघात सारे फिरती   २ जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी   ३ मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित कुणी करी […]

असंबधता

त्याला तपासण्यासाठी,  नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सिनेमाला चला

नको जाणे सिनेमाला, गर्दीचा आहे पहिलाच दिवस याच विचाराने थिएटर पडले ओस चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी. निराशली मंडळी,  बघूनी हाऊस फूल पाटी — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गर्दी पांगविण्याची कला

गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी. गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

माझी नोकरी

नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून,  मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरिर सर्व शांत झाले आता, फायर ब्रिगेड नोकरी मिळता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सारेच चोर

हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

काळी बायको

काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ  ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सार्थकी जीवन

सारे जीवन जाते आपले अन्न शोधण्याकडे काय उरते आमच्या हाती विचार करा थोडे….१ जीवनाची मर्यादा ठरली आयुष्य रेखेमुळे आज वा उद्या संपवू यात्रा हेच आम्हांस कळे….२ धडपड करी आम्ही सारी देह सुखा करिता विचार ही मनांत नसतो इतरांच्या करिता….३ वेळ काढावा जीवनातुनी इतरांसाठी थोडा सार्थकी लावा आयुष्य तुम्ही जीवन शिकवी धडा….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

1 10 11 12 13 14 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..