नवीन लेखन...

मन तुझे कां गहिवरले ?

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ? शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ? देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ? सुर्वणाक्षरीं वाचून गाथा आदर्शमार्गी पडतील पाऊले […]

चांदण्यातील आठवणी

हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।। आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी […]

ज्येष्ठांचा अनुभवी सल्ला

आम्ही ज्येष्ठ नागरिक. आयुष्याची ६०-७०-८० वर्षे वा त्याहून आधीक काळ जीवन यात्रेमध्ये घालविली. सुख दुःखाचे अनेक चढउतार बघीतले. प्रसंग अनुभवले. ज्ञानापेक्षाही अनुभव श्रेष्ठ असतो हे जाणले. बोल सारे अनुभवाचे     त्या बोलीची भाषाच न्यारी सुख दुःखाच्या गुंत्यामधला     अर्थ सांगतो कुणीतरी. काळाप्रमाणे व परिस्थितीनुसार विचार आणि वागणे बदलते. आमचा काळ व आजचा काळ ह्यातील तफावत जी जाणवली त्यावर […]

कोण हा कलाकार ?

न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई […]

आईचे ऋण

आईचे ऋण मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला      तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत         नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी         उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या […]

निसर्ग सुख!

आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे? निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें डॉ. भगवान […]

दुष्टाचा मृत्यु

सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली […]

परावलंबी

जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल […]

बीज – वृक्षाचे चक्र कुणाचे ?

सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते […]

1 13 14 15 16 17 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..