नवीन लेखन...

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे […]

द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।। द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।। वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘  धावूनी ये    मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।। धावूनी आला […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला कथा किर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले जीवनाचे कांहीं न मिळाले […]

पूजाविधी गाभा

सोडूनी दिली मी पूजाअर्चा,  समाधान मज ज्यात न लाभले दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,  एक भाग तो सदैव वाटले बालपणी मज कुणी शिकविले,  पूजाअर्चा आन्हकी सारे ठसले नाही मनात कधीही,  भक्तीला हे पोषक ठरे पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,  लक्ष आमचे केंद्रीत होते हळदी कुंकू गंध फूले आणि,  दीपधूप हे मधूर जळते सुबकतेच्या पाठी लागूनी,  यांत्रिकतेसम आम्ही झालो अर्थ ज्याचा कधी […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार  निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार  आलास तूं कामी  १   तुझ्या मोरानें   दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें   शिकविले सत्य  २   कोकीळेचे गान   सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान   इंद्रधनुष्या परि  ३   मुंग्याची वारुळे   दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे   शिकवी हस्तकला  ४   घारीची भरारी   स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं    जाणला प्रेमळपणा  ५   विजेची […]

हट्टी अनु

एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।। नदी कांठच्या वनीं थुई थुई नाचूनी पिसारा फुलवुनी तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु   ।।१।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   मोरपिसे सुंदर रंग बहारदार दिसे चमकदार बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं   ।।२।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   […]

ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।।   बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता   भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता […]

1 2 3 4 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..