धन्य ती महाराष्ट्र माऊली !
धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ// ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने […]