अविवेकी कष्ट
विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना, कसे सुंदर होईल घरटे, रंगवित होते कल्पना ।।१।। खिडकीवरल्या कपारीमध्ये, शोधला होता एक निवारा, निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या, आणीत होते काडीकचरा ।।२।। उजाडता कुणी खिडकी उघडे, चिमण्या बांधीत घरटी, सांज समयी बंद झापडे, ठेवी त्यांना एकटी ।।३।। नित्य दिनी प्रात: समयी, कुणीतरी फेकी कचरा समजूनी, […]