नवीन लेखन...

लाडक्या नातीस

जन्मापासूनी बघतो तूला परि जन्मापूर्विच ओळखले रोप लावले बागेमध्ये फूल तयाने दिले   चमकत होती नभांत तेंव्हा एक चांदणी म्हणूनी दिवसाही मिळावा सहवास हीच आशा मनी   तीच चमकती गोरी कांती तसेच लुकलुकणे मध्येच बघते मिश्कीलतेने हासणे रडणे आणि फुलणे   चांदणीचा सहवास होता केवळ रात्रीसाठी दिवस उजाडतां निघून गेली आठवणी ठेवून पाठी   नको जाऊस […]

देहातील शक्ति

नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे   […]

लाडकी चांदणी

एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती चमचम चमके, मिश्कील हासे,      लक्ष्य खेचून घेई   वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला दिवसभराचा विरह तिचा,          नाही सहन झाला   जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी होकार दिला चटकन तिने,        किंचित हास्य करुनी   नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली   नजर पडता नातीवरी,         चकित  झालो एकाक्षणी अंतरयामी  जणीव झाली,        हीच ती माझी चांदणी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी बघण्याची मज ओढ लागली फुलूनी गेली बाग कशी ही बीजे जयांची तूच पेरीली   कल्पकता ही अंगी असूनी दुरद्दष्टीचा लाभ वसे अंधारातील दुःखी जनांची चाहूल तुज झाली असे   शीतल करुनी दुःख तयांचे जगण्याचा तो मार्ग दाखविला सोडूनी सारे वाटेवरी आकस्मित तू निघूनी गेला   आस्तित्वाची चाहूल येते आज इथे केंव्हातरी […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी   विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी   हीच त्याची महिमा   ।।१।। जवळ असूनी दूर ठेवितो   आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो   कोणी न समजे त्यासी   ।।२।। मोठे मोठे विद्वान   त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन   विश्लेषन करिती प्रभूचे   ।।३।। कांहीं असती नास्तिक   कांही  असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी मस्तक   चर्चा करिती […]

चि. मानसीस ( दिड वर्षाच्या नातीस )

थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]

बहीणीची हाक

राखण करितो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते….१ आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या….२ प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले….३ अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होवून जाते बघ मी दिसत  नाही कुणा हे बंधन, […]

गतकाळ विसर

विसरून जा भूतकाळ तो,  नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही,  जीवन सारे यशस्वी करी….१,   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,  उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते,  अपयश आले हे जाणूनी…२,   ज्ञान जगाचे मिळूनी तुला,  जन्म जहाला आजच खरा अनुभवी नव बालक तूं,  वाहून नेई जीवन धुरा…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०      

मिठापरी जीवन

खारेपणा हा अंगी असतां,  कोण खाईल केवळ मीठ परि पदार्थाला चव येई,  मिसळत असता तेच नीट….१,   जीवन सारे खडतर ते,  भासते मिठासम मजला केवळ जीवन बघता तुम्हीं,  पेलणें अवघड सर्वाला..२,   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते हर घडीच्या प्रसंगामध्ये,  समाधानाचे अंकूर फूटते….३   डॉ. भगवान  नागापूरकर ९००४०७९८५०    

पुण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती,  सुटी नाणी काही वस्तूंची ती खरेदी करण्या,  सर्व बाजार पाही….१, सराफ्याच्या दुकानी दिसला,  एक हिऱ्याचा हार डोळे माझे चमकूनी गेले,  फिरती गरगर…२, दाम विक्रीचे जाणूनी घेता,  हताश मी झालो हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो…३ दोन वेळची पूजा करूनी,  जप माळ जपती खूप साचले पुण्य आपले,  हे कांहीं समजती….४, कसा मिळेल […]

1 6 7 8 9 10 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..